Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज 52 कोरोनामुक्त तर 31 नव्याने पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आतापर्यंत 21,321 बाधित झाले बरे
  • उपचार घेत असलेले बाधित 528

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 28 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 52 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 31 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 210 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 321 झाली आहे. सध्या 528 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 70 हजार 75 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 45 हजार 376 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये राणी लक्ष्मी वार्ड बल्लारपुर येथील 60 वर्षीय पुरूष व गजानन महाराज चौक चंद्रपूर मुळ रा. गडचिराली येथील 57 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 361 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 333, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 17, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 31 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 16, चंद्रपूर तालुका चार, भद्रावती एक, सिंदेवाही दोन, चिमुर तीन, वरोरा चार व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.