Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 119 नवीन कोरोना बाधित तर 38 कोरोनामुक्त.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि.21 नोव्हेंबर : आज जिल्हयात 119 नवीन बाधित आढळून आले. तर आज 38 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 7325 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 6657 वर पोहचली. तसेच सद्या 593 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 75 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.88 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 8.10 टक्के तर मृत्यू दर 1.02 टक्के झाला.

नवीन 119 बाधितांमध्ये गडचिरोली 57, अहेरी 8, आरमोरी 1, भामरागड 1, चामोर्शी 9, धानोरा 4, एटापल्ली 6, कोरची 1, कुरखेडा 15, मुलचेरा 2, सिरोंचा 4 व वडसा येथील 11 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 38 रूग्णांमध्ये गडचिरोली 17, अहेरी 3, आरमोरी 6, भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 1, एटापल्ली 2, मुलचेरा 2, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0 व वडसा मधील 2 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ 1, आयटीआय चौक 1, कॅम्प एरिया 2, टेंभा 1, आराध्यानगर 1, तिरुपती कॉम्पलेक्स बट्टुवार पेट्रोलपंपच्यामागे 2, गोकुलनगर 8, लांजेडा 1, आयटीआय बायपास मथुरानगर 1, मोक्षीखांब 1, गांधीवार्ड 1, स्नेहानगर 1, पंचवटीनगर 1, रामनगर 2, गोगाव 1, पोटेगाव 1, राजघाटाचेट 1, लालबहादुर विद्यालय जवळ डोंगरगाव 1, राधे बिल्डींग जवळ 2, इतर स्थानिक 16, इंदिरानगर 1, मुरखडा 1, येवली 1, डीआयजी कार्यालय 1, कारमेर स्कुलच्या मागे 1, शिवाजी कॉलेजच्या मागे 1, अयोध्यानगर 1, कस्तुरबा वार्ड 1, बर्डी 1, फुड लव्हर रेस्टॉरेंट धानोरा रोड 1, कन्नमवार नगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 2, स्थानिक 3, नागेपल्ली 2, आलापल्ली टिचर कॉलनी गोंड मोहल्ला 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक‍ 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये मन्नेराजाराम पीएचसी 1, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, लखमापुर 1, एमजेएफ स्कुल आष्टी 1, आष्टी 2, सोनापुर 1, येनापुर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये रांगी 1, सोडे 2, स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये उडेरा 3, डुम्मे 1, घोटसुर 2, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये अंगारा 7, अरततोंडी 2, गेवर्धा 2, खामटोला 1, घट्टी 1, उराडी 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये सुभाषग्राम आयजीएम शाळा 1, विवेकनंदपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, टेकाडा 1, झेडपी शाळा 1, तसेच वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कोकडी 2, तुकुम वार्ड 2, आमगाव 1, गांधीवार्ड 2, बी ए व्ही 2, पी जी एच 1, कोंढाला 1, असा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.