Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांबद्दल अवमानजनक लिखाण करणा­ऱ्या विकृत्यांच्या गडचिरोली पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : आष्टी हद्दीतल्या मौजा सोमनपल्ली आणि दुर्गापूर इथं गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांद्वारे विकृत पद्धतीने मानवी अवयवांची चिन्हं, आकृत्या काढल्याचं निदर्शनास येत होत. दरम्यान सोमनपल्ली इथल्या सार्वजनिक बस स्टाॅपवरच्या पत्र्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक आणि आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार नागरिकांनी २१ फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे केली होती. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वात तपास सुरु केला.

सर्वप्रथम आष्टी पोलीस स्टेशन आणि गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांची एकूण १० तपास पथके तयार करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या परिसरात १० किमीच्या हद्दीत काळ्या रंगाच्या शाईनं विविध अश्लील आकृत्या अज्ञातांद्वारे मागील तीन दिवसांपासून बनविल्या जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलीसांनी आष्टी आणि चामोर्शी हद्दीतल्या गावांना भेट देऊन मिळविलेल्या गोपनिय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

यातला एक सुमित मंडल ( वय वर्षे १८ ) तर दुसरा अल्पवयीन मुलगा आहे. सदर आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्राविषयी अधिक विचारणा केली असता, आपल्याकडून सदर कृत्य घडल्याचं त्यांनी मान्य केलं. आष्टी पोलीसांकडून आरोपी सुमित जगदिश मंडल याला अटक करण्याची प्रक्रिया सुरु असून अल्पवयीन आरोपीस बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गुन्ह्राचा अधिक तपास सुरु आहे. तसंच सामाजिक सलोख्याचा विचार करुन अशा प्रकारचं कोणतंही कृत्य नागरिकांनी अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गडचिरोली पोलीसांनी दिला आहे.

Comments are closed.