Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एका मूत्युसह गडचिरोली जिल्हयात आज 05 कोरोनामुक्त, तर 15कोरोनाबाधित..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,(जिमाका) दि.06, ऑगस्ट 22 :-  आज गडचिरोली जिल्हयात 599 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या 15 असून 05जणाने कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37841 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36975 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 90 झाली आहे.एका मूत्युमध्ये 56 वर्षीय पुरुष ता.कुरखेडा जि.गडचिरोलीचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 776 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.24टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.
आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02,अहेरी तालुक्यातील 02, आरमोरी तालुक्यातील 01,चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02,धानोरा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 01, तसेच वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हयात 144 कलम लागू..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.