Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज २३ नवीन कोरोना बाधित तर ३८ कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 22 मार्च: आज जिल्हयात २३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज ३८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०१६४ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या ९७५४ वर पोहचली. तसेच सद्या ३०२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९७ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २.९७ टक्के तर मृत्यू दर १.०६ टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन २३ बाधितांमध्ये गडचिरोलीतील १८, भामरागड तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, चामोर्शी २, तर वडसा तालुक्यातील १ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ३८ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील २१, आरमोरी ५, धानोरा १, एटापल्ली ३, कोरची ६, कुरखेडा ४, तर वडसा मधील २ जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये सर्वोदय वार्ड २, नवेगाव २, गुरुकुंज कॉलनी १, शाहू नगर ३, वनश्री कॉलनी २, चामोर्शी रोड १, गोकूल नगर १, शिवाजी नगर १, आरटीओ ऑफीस जवळ १,स्थानिक १, प्लाटिनम ज्युबिली शाळेजवळ १, डोंगरगाव १, चामोर्शी तालुक्यातील आष्टी २, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, भामरागड तालुक्यातील एलबीपी हेमलकसा १, वडसा तालुक्यातील कुरुड १, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये १ जणांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.