Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंदिया जिल्ह्यात आज 23 रुग्णांची कोरोनावर मात तर 34 कोरोना पॉझिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.58 टक्के

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंदिया, दि. 23 डिसेंबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 23 डिसेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आजपर्यंत 13,433 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 12,941 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 315 आहे. 114 क्रियाशील असलेले बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 177 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 95.58 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.23 टक्के आहे तर डब्लिंग रेट 226.4 दिवस आहे.
जिल्ह्यात आज 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया-17, तिरोडा-00, गोरेगाव-08,आमगाव-03, सालेकसा-01, देवरी-02, सडक अर्जुनी-01, अर्जुनी मोरगाव-02 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील 23 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली. तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया-21, तिरोडा-00, गोरेगाव-01, आमगाव-00, सालेकसा-00, देवरी-00, सडक अर्जुनी-01, अर्जुनी मोरगाव-00 रुग्णांचा समावेश आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 55193 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 43931 नमुने निगेटिव्ह आले तर 8033 नमुने पॉझिटिव्ह आले. 58 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 56759 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 51038 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर 5721 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात. त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9823254520, 9765090777, 9326811266, 8788297527 आणि 9823238057 यावर रूग्णांनी संपर्क साधावा. रुग्णांच्या सुविधेसाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल एसएमएसद्वारे कळविण्यात येतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.