Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जांभूळ प्रक्रीया उद्योगाचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रभागसंघ तर्फे सुरू करण्यात आलेल्या जांभूळ प्रक्रीया (स्ट्रीप) उद्योगाचे ऑनलाईन उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त् मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, प्रकल्प संचालक प्रदीप लाटे,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड, जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर आदी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जांभूळ स्ट्रीप उद्योगाच्या माध्यमातून प्रभागसंघाच्या महिलांसाठी उपजीविकेचे  साधन उपलब्ध करून देण्यासोबत जांभूळ फळाची साठवणूक करणाऱ्या महिला व शेतकऱ्यांना कच्च्या मालाची योग्य किंमत मिळवून देणे शक्य होणार आहे. जांभूळ फळ साठवणूक करणारे, फळ विक्रेते, गाव वनउपज संरक्षण समिती, जांभूळ फळावर प्रक्रीया करणारे आदी संबंधित घटकांची क्षमता बांधणीदेखील या माध्यमातून होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभागसंघांतर्गत 19 ग्रामसंघातील 21 गावांची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. एकूण 3 हजार 675 कुटुंबे आणि 350 स्वयंसहायता समूहांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत  6 लाख 60 हजार तर प्रभागसंघाची गुतवणूक 3 लाख 40 हजार असे एकूण 10 लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर अत्याचार!

‘त्या’ चिमुरड्याच्या भेटीसाठी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची रुग्णालयात धाव; भोंदूबाबावर पोलिस कारवाई करण्याचे दिले आदेश

खतांचा जूना साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री वडेट्टीवार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.