माजी आ.दिपक आत्राम यांच्या उपस्थितीत नूतन वर्ग खोलीचे लोकार्पण
माजी आ. दिपक आत्राम यांनी जिल्हा परिषद येथे पाठपुरावा करून नवीन वर्ग खोली मंजूर करण्यात यश ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मी सत्तेत नसलो तरी लोकांच्या हिताचे आधीपासूनच निर्णय घेत आलेलो आहे .विद्यार्थ्याची मागणी हि माझी मागणी आहे.त्यामुळे मी सत्तेत असलो काय नसलो काय शेवटी आपण एकाच परिवारातील आहोत .आपली समस्या ती माझी समजून आधी हि काम केले आणि आजतागायत करीत राहणार.माजी आ.दिपक आत्राम…
गडचिरोली दि ,२५ : अहेरी तालुक्यातील रायगट्टा येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण झालेली वर्गखोली होती. यामुळे शाळकरी विद्यार्थांना मान्सून काळात जीर्ण झालेल्या इमारतीत पाणी गळतीसह विद्यार्थांना धोका निर्माण झाल्याने वर्गात बसून शिक्षण घेणे धोक्याचे झाले होते.
रायगट्टातील शाळेच्या जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यासह पालक चिंतेत सापडले होते . शेवटी शाळेची दयनीय अवस्था पाहून ग्रामसभा आयोजित करीत ठराव पारित केला . शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र यश आले नाही . शेवटी गावकऱ्यांनी माजी आ.आत्राम यांच्याकडे भेट घेवून स्थानिक शाळेच्या नवीन इमारतीसह गावाच्या विविध समस्याचा पाठाच वाचला . माजी आ.आत्राम समस्या पाहून राहवले नाही . मी सत्तेत नसलो तरी लोकांच्या हिताचे आधीपासूनच निर्णय घेत आलेलो आहे .विद्यार्थ्याची मागणी हि माझी मागणी आहे.त्यामुळे मी सत्तेत असलो काय नसलो काय शेवटी आपण एकाच आहोत .आपली शाळा ती माझी शाळा समजून नवीन इमारत बांधण्याचा चंग बाधला . प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून शेवटी नवीन वर्ग खोलीचे बांधकाम २०२१-२२ या वर्षात मंजूर करून कामाला सुरुवात केली आणि पाहता पाहता नवीन इमारत बांधून होताच गावकर्यांनी आग्रह करीत नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला आमंत्रित करून लोकार्पण सोहळा माजी आ.आत्राम यांच्या हस्ते पार पडला .त्यामुळे गावात आनंद व्यक्त होत आहे.
यावेळी माजी सरपंचा शकुंतला कुडमेथे, पोलीस पाटील सत्यम बंडमवार,माजी सरपंचा ज्योतीताई जुमनाके,माजी उपसरपंच गुरुदास पेंदाम, माजी उपसरपंच भगवान मडावी,माजी ग्राप सदस्य नारायणजी कंबगोनीवार,माजी ग्राप सदस्या वंदना अलोने, माजी ग्राप सदस्या महेश्वरी बत्त्तूलवार,माजी ग्राप सदस्य सुधाकर आत्राम,आविस सल्लागार माधव कुडमेथे,व्यंकण्णा कडार्लावार,नागेश चिंतावार,रामशंकर अंबलीपवार,नारायण चिटकला, संतोष मोहूर्ले,रज्जू मोहूर्ले,रमेश पोरतेट, लक्ष्मण पोरतेट, संपत चिटकला,दुर्गाजी आलाम,ग्रामसेविका संतोषी सडमेक,शिक्षक सोयाम,वाचामीसह गावकरी उपस्थित होते.
हे देखील वाचा ,
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महाविजय-२४ अभियानाचा शुभारंभ
गोंडवाना विद्यापीठात प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान कार्यशाळा संपन्न
Comments are closed.