Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्यसंग्रमात जनजाती नायकांचे योगदान यावर आधारित पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली  27 सप्टेंबर :- भारतीय लेखन प्रणालीचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यामध्ये जनजाती नायकांच्या विषयी फारसा उल्लेख दिसत नाही, त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये त्यांचा समावेश असायला हवा आहे. प्राचीन भारताचा जर आपण इतिहास पाहिला तर वेद, पुराणांपासून ते महाभारतामध्ये सुद्धा अनेक जनजाती नायक आहेत. ज्यांचे कार्य येणाऱ्या पिढीला माहिती व्हावे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात त्यांचे त्याग आणि बलिदान आपण स्मरायला हवे आहे. जल, जंगल ,जमीन यांचं संरक्षण त्यांनी केलेले आहे. जनजाती समाज हा देशाची संपत्ती आहे असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे प्राध्यापक डॉ. श्याम कोरेटी यांनी केले.

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, भारत सरकार, नवी दिल्ली व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्य संग्रात जनजाती नायकांचे योगदान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, प्रमुख वक्ता म्हणून माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य रा.तु.म.नागपूर, विद्यापीठ, नागपूर दिनेश शेराम, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार नवी दिल्लीचे प्रा. विवेकानंद नरताम आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यसंग्रमात जनजाती नायकांचे योगदान यावर आधारित पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कवळे यांनी देशांच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली पण या स्वातंत्र्यासाठी कितीतरी क्रांतीकारकांनी बलिदान दिले त्यांची नावं अजून पर्यंत आपल्याला माहिती नाही गडचिरोलीत देखील कितीतरी जनजाती क्रांतिकारक आहेत. ज्यांची नावं अजूनही इतिहासाच्या पानावर नाहीत अशा क्रांतिकारकांची माहिती आपल्याला व्हावी तसेच दिल्लीला सगळ्या विद्यापीठाच्या कुलपतींची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, जेणेकरून याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी हाच या कार्यक्रमांचा उद्देश आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार नवी दिल्ली प्रा. विवेकानंद नरताम म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जनजाती नायकांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. जनजाती समाज हा जंगलांमध्ये राहिलेला आहे. त्यांची संस्कृती ही निसर्गाशी निगडित आहे. येणाऱ्या पिढीला आपण याची माहिती द्यायला हवी आहे तसेच राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अधिकार काय आहे ,त्यांचे कार्य काय आहे हे पीपीटी द्वारे समजून देण्यात आले. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाबाबत माहिती व्हावी म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठांमध्ये करण्यात येते आहे. असे ते म्हणाले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे निरसन केले.

माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य नागपूर विद्यापीठ, नागपूर दिनेश सेराम यांनी जनजाती नायकांचे स्वातंत्र्यसंग्रामात योगदान काय आहे याचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी रामटेक येथे स्टडी सेंटर चालू करणार आणि स्थानीय संसाधनापासू रोजगार कसा मिळेल याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये हे रोल मॉडेल ठरेल असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान आर. आर. फिल्म चित्रपटातील भीमू कुमरे आणि अल्लुरी सिताराम राजू या जनजाती नायकांवर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटातील गीत दाखवण्यात आले. हे बघताना सभागृहात उपस्थित सगळेच भारावले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. नरेश मडावी तर आभार डॉ. रूपाली आलोणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग संयोजक डॉ.नरेश मडावी, प्रशासनिक संयोजक डॉ.वैभव मसराम, शैक्षणिक संयोजक डॉ. प्रफुल्ल नांदे यांनी परिश्रम घेतले.

हे पण वाचा :-

वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.