Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड प्रकल्पाच्या ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर, संतप्त जमावाने ट्रक जाळले.

जीवघेण्या सुरजागड प्रकल्पाचा आणखी एक निष्पाप बळी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

लगाम गडचिरोली  27 सप्टेंबर :-  गडचिरोलीतल्या जीवघेण्या सुरजागड प्रकल्पामुळे आणखी एक निष्पाप जीव गेला आहे. सुरजागड येथील खाणीतून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. बिजोली जयदार असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती सुभाष जयदार हा गंभीर जखमी झाला आहे. चंद्रपूर – आल्लापली महामार्गावरील शांतीग्राम गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली असून. यामुळे संतप्त जमावाने १० ते १२ ट्रक पेटवून दिल्या आहेत. त्यामुळे मुळचेरा तालुक्यात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेला आणि नागरिकांच्या संतापाचे कारण असलेला गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील सुरजागड प्रकल्प. या प्रकल्पामुळे रोजच काहीना काही दुर्घटना घडत असतात.आज मंगळवारी संध्याकाळी मुलचेरा तालुक्यातल्या कांचनपूर येथील बिजोली आणि सुभाष जयदार हे दांपत्य आपल्या दुचाकीवर शांतीग्राम वरून कांचंनपुरला जात होते. मात्र, त्यांची दुचाकी शांतीग्राम गावानजीक दामपुर फाट्याजवळ आली असताना, सुरजागड लोह प्रकल्पाच्या येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या धडकेत बिजोली आणि सुभाष दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती देखील गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये चीड आणणारी गोष्ट म्हणजे अपघात होताच आरोपी ट्रक चालकाने जखमींना मदत न करताच ट्रक रस्त्यात सोडून पसार झाला. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच परिसरातील जमाव संतप्त झाला आणि त्यांनी अपघातग्रस्त ट्रकसह सुरजागड लोह प्रकल्पातून लोहखनिज वाहतूक करणारे आणखी १० ते १५ ट्रक जाळले. त्यामुळे या परिसरात जिकडे तिकडे आगीचे तांडव दिसून येत होते. तसेच नागरिकांमध्ये देखील अतिशय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरजागड लोह प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर नेहमीच अपघात होत असून सामान्य नागरिकांचे निष्पाप बळी जात आहेत. शिवाय प्रचंड धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. यामुळे या सर्व गष्टींमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अपघाताचे निमित्त मिळताच सुरजागड प्रकल्पाला असलेल्या विरोधाचा उद्रेक झाला.

संतप्त नागरिकांनी लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक ना लक्ष केलं आणि आगीच्या बक्षस्थानी दिले. या घटनेची माहिती मिळताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अहेरी वरून अतिरिक्त पोलीस कुमक घटनास्थळी पाठविली असली तरी अंधार होत असल्याने आणि लोकांचा आक्रोश असल्याने पोलीस सावध पवित्रा घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र नागरिकांच्या अडचणी समजून न घेता जिल्हा प्रशासनाकडून लोह प्रकल्पाला झुकते माप देत असल्यामुळे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधींना देखील जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागणार हे मात्र नक्की.

हे पण वाचा :-  

 

Comments are closed.