Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विविध मागण्यांसाठी वनरक्षक व वनपाल संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : शासन निर्णय ६ ऑगस्ट 2002 व दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ च्या स्पष्टीकरणात्मक सुचना नुसार एकस्तर – पदोन्नतीची वेतननिश्चिती सुधारित करून न दिल्याबाबत वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वतीने १७ फेब्रुवारी पासून वनविभाग कार्यालय, गडचिरोली समोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

शासकीय माध्यमातून शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम वनपाल–वनरक्षक करीत असतात. वनपाल व वनरक्षकांचे काम पाहून शासनाने एकस्तर पदोन्नतीची सवलत देऊ केली आहे. परंतु आजतागायत कर्मचाऱ्यांचे एकस्तर वेतनश्रेणी बाबतची मागणी पुर्ण झालेली नाही. संघटनेच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती असंतोष निर्माण झालेला आहे. सदर मागण्यांसाठी वनरक्षक व वनपाल संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आंदोलनात संघटनेचे वृत्त अध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, सचिव सुनिल पेंदोरकर, विभागीय सचिव गुरुनाथ वाढई, संघटनेचे अध्यक्ष अनंत ठाकरे, कार्याध्यक्ष राजेंद कोडापे, रुपेश मेश्राम, अतुल धात्रक, सुरेश डंकरवार, अरुण जाबोर, राजु टेंभर्णीकर, विलास कुमोटी, धनश्री दिकोंडावर, वाय.सी. कर्रेवार, लिना गेडाम, रंजना तलांडी सहीत शेकडो वनपाल व वनरक्षक सहभागी झाले आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.