Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; नागपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी दिनांक ८ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस व वादळीवाऱ्यासह विज पडण्याची शक्यता वर्तवली आहे.  दिनांक ९ जुलै रोजी एक किंवा दोन ठिकाणी विज व वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दिनांक १० जुलै ते १२ जुलै या कालावधी मध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साधारणत: दुपारी २ ते ७ या वेळेत विज पडण्याचा धोका असल्या कारणानें पाऊस व वादळीवारा सुरू असताना झाडा खाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजी पूर्वक शेताची कामे करावी व शक्य असल्यास घरीच थांबावे. घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी.

हे देखील वाचा  :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

भीषण अपघात! दोन दुचाकींची समोरासमोर धडक, १० वर्षीय बालकासह ५ जणांचा जागीच मृत्यू

गडचिरोली ब्रेकिंग: मुसळधार पावसाने गोविंदपूर पुलानजीक असलेला रपटा गेला वाहून, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

 

 

 

नदी किंवा नाल्या वरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.