Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतातील पहिली एरिअल एक्शन फिल्म ‘या’ दिवशी होणार रिलीज

दीपीका-ऋतिक प्रथमच दिसणार एकत्र

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 28 ऑक्टोबर :- अभिनेत्री दीपीका पादूकोन आणि अभिनेता ऋतिक रोशन या जोडीचा पहला चित्रपट ‘फायटर’चे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. व्हायकाॅम 18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्य पिक्चर्स द्वारे निर्मित ‘फायटर’ सिनेमा 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि दीपीका पादूकोन भारतीय वायुसेनेचे पराक्रमी वैमानिकांची भूमिका साकारणार असून अनिल कपूरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमात ऋतिक व दीपीकाची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांना या सिनेमाबाबत उत्सुकता लागली आहे.
हिंदुस्थानातील सर्वात मोठे एक्शनपट बनवण्यासाठी प्रसिध्द दिग्दर्शक सिध्दार्थ आंनद ‘फायटर’च्या निमित्त्याने पहिल्यांदाच निर्मात्याच्या खुर्चीत बसत आहेत. या चित्रपटात चाहत्यांना सेल्युलाॅइडरवर कधीही न पाहिलेला अनुभव देण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. देशाच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणे एक सुवर्णयोग आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘फायटर’ हा देशातील पहिला एरियल एक्शन चित्रपट असून या सिनेमाच्या निमित्ताने ऋतिक रोशन आणि दीपीका पादुकोन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण जगभर झाले असून निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्र आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.