Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कॅन्सरग्रस्तच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दालख करणे ईडीला पडले महागात

ईडी अधिकाऱ्याला ठोठावला सर्वोच्च न्यायालयने एक लाखांचा दंड 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर :- कॅन्सरग्रस्तच्या जामिन विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दालख करणे सक्तवसुली संचालनालयाला ईडी ला चांगलेच महागात पडले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय ने एका प्रकरणात आरोपी असलेल्या कॅन्सरग्रस्ताला जामीन दिला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशा विरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय ने याचिका दाखल करण्याची परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला 1 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.

याचिकेवर न्यायमुर्ती एम.आर. शाह तसेच न्यायमुर्ती सुंदरेशन यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली. दरम्यान, जामीन आदेशात न्यायालयाच्य हस्तक्षेपाची आवश्यकता नाही असे स्पष्ट करत खंडपीठाने विशेष परवानगी याचिका फेटाळली. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर 1 लाखांचा दंड ठोठावत आज 28 ऑक्टोबर पासून पुढील चार आठवड्याच्या आता विभागाकडून न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये दंडाची रक्कम जाम करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संबंधित दंडाची रक्कम जाम केल्यानंतर यातील 50 हजार रूपये राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि 50 हजार रूपये मध्यस्थता तसेच लवाद आणि सामंजस्य योजना समिती सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.