Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाला नागाशी मस्ती करणं पडलं महागात

  • नागाने तरुणाला 4 वेळा घेतल्या चावा
  • नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाशिक, दि. १२ मार्च: निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथील मद्यपी मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याने नागाशी मस्ती सुरू केली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. मंगेश इतका नशेत होता की त्याने कमरेखालील पॅन्ट काढून फेकून दिली होती. तो यावेळी अर्धनग्न अवस्थेत होता या मस्ती दरम्यान नागाने मंगेशला चार वेळा चावा घेतला. चावा घेतल्याच्या रागात मंगेश ने नागाला हाताने ठेचून मारून टाकण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मंगेशला नागाने चार वेळा चावा घेतल्याने मंगेश ची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला निफाड येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे अद्यापही मंगेशची प्रकृतीही चिंताजनक असल्याने मंगेश हा मृत्यूशी झुंज देत आहे.  

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Video:

https://fb.watch/4bcMXIapjv/

Comments are closed.