Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सेवाग्राम आश्रम पर्यटन स्थळ नाही तर प्रेरणास्थान झाले पाहिजे – पालकमंत्री सुनील केदार

गांधी विचारांच्या प्रसारासाठी बजेटमध्ये वेगळी तरतूद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. १२ मार्च: महात्मा गांधी यांचे सेवाग्राम आश्रम पर्यटन स्थळ न राहता ते प्रेरणास्थान झाले पाहिजे, जगाला गांधी विचारांची गरज आहे. त्यामुळेच आघाडी सरकारने यावेळच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशन सत्रात महात्मा गांधी यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेगळी तरतूद केली आहे. त्यासाठी वेगळे हेड तयार करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात आयोजित आझादीचे अमृत वर्ष हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला. यादरम्यान पालकमंत्री बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशात क्रांती विचारधारेने घडली आहे, देशाला विचारांमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे, सेवाग्राम ही कर्मभूमी प्रेरणा देणारी आहे, या कर्मभूमीतून विचार जगापर्यत पोहचले पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी देखील महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागावर भाष्य केले. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले त्यामुळे राज्यात तीन ठिकाणी कार्यक्रम होत आहे. त्यातीलच एक आझादीचे अमृत महोत्सव हा कार्यक्रम वर्ध्यात सेवाग्राम आश्रमात पार पडला आहे. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर उपस्थित होते.

Comments are closed.