Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आवडत्या बैलाचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात

साथरोग पसरविण्याच्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

डोंबिवली, दि. १२ मार्च: एकीकडे कोरोना चा आकडा पुन्हा वाढत असताना डोंबिवलीतुन एक वेगळी बातमी समोर येत आहे. लग्नसराई म्हटली की पाहुण्यांची ये जा, उठ बस, जेवणाच्या पंक्ती इतकेच नाही तर नाच गाणी इत्यादी चित्र डोळ्यासमोर येते मात्र डोंबिवलीत ही सर्व लगबग एका बैलाच्या वाढदिवासाठी दिसून आली.
कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता डोंबिवली पश्चिमेकडील रेतीबंदर रोड परीसरातील एका तरुणाने चक्क आपल्या बैलाच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन केले. सेलिब्रेशन चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील वायरल झाला असून या व्हिडिओ च्या आधारे विष्णुनगर पोलिसांनी अधिक तपास करत किरण म्हात्रे या तरुणावर साथरोग प्रतिबंधक् अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हे सेलिब्रेशन सध्या कल्याण डोंबिवलीत चर्चेचा विषय झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान एकीकडे नागरिक, व्यापारी, फेरीवाले यांनी नियम पाळले नाही तर त्यांच्यावर थेट कारवाई केले जाते मात्र असे सोहळे मोठ्या प्रमाणावर होत असताना पोलीस प्रशासन आणि पालिकेचे पथकं नेहमी काय करत असतात हा सवाल निर्माण झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.