Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयाचा ‘मुरुम’ उपसा करुन लावली तलावाची ‘वाट’

  • कुरुलच्या संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासन दरबारी व्यथा मांडल्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

सोलापूर दि.१२ मार्च :- रत्नागिरी-सोलापूर  राष्ट्रीय महामार्ग कामासाठी कुरुल येथील पाझर तलाव नं.१ आणि नं. ६ येथून मुरूम उचलण्यासाठी महाराष्ट्र शासन कडून दिलीप बिल्डकॉन ली. कंपनीला मुरूम परवानगी मिळाली होती. मात्र नियमापेक्षा जास्त व जास्तीची खोली झाल्याने तलावाची अक्षरशः वाट लागली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तलावात असणाऱ्या पाणी पुरवठा विहिरीचे, तलावाखाली असलेल्या सुमारे ५०० एकर शेतीचे क्षेत्र जनावरांना होणारी पाण्याची भटकंती पाहता तलावाचे भवितव्य धोक्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी कुरुल चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासन दरबारी व्यथा मांडल्या. मात्र प्रशासनाकडुन कोणतीच दखल घेतली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी तलावातील मुरुम उपशाचे काम बंद पाडले आहे.

कुरुल पाझर तलाव क्र.१ मधून मुरुम उपशासाठी शासनाकडुन दिलीप बिल्डकॉन कंपनीला ६२ हजार ब्रासची व जमिनीपासून ३ मिटरची परवानगी देण्यात आली आहे. मात्र गेली ४ महिने या तलावातुन मुरुमाचा बेसुमार उपसा सुरु असुन सुमारे दिड लाख ब्रास व १५ ते २० मिटर खोदाई झाली आहे. यामुळे तलावाला धोका निर्माण झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भविष्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर त्यामध्ये पाणी राहणारच नाही, परिणामी तलावाखाली असणाऱ्या सुमारे ५०० एकर शेतीत दलदल झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय याच तलावात राष्ट्रीय पेयजल योजनेतुन कुरुल ग्रामपंचायतीची विहिर आहे. या विहिरीला देखील धोका निर्माण झाला असुन भविष्यात १५ हजार लोकसंख्या असलेल्या कुरुल ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल अशी धास्ती लागली आहे तर जंगली प्राण्यांना, गाई-गुरे व जनावरांना गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील तलावात पिण्यासाठी पाणी राहिले नाही. सध्या असलेल्या एखाद्या पाणी पिण्यासाठी जनावरांना ५०-६० फुट खोल उतरावे लागल्याने जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

यामुळे शुक्रवारी पं.स. सदस्य जालिंदर लांडे यांच्या नेतृत्वाखाली, माणिक पाटील, पांडुरंग जाधव, सुरेश जाधव, आनंद जाधव, बाळासाहेब लांडे, टि.डी. पाटील, गहिनीनाथ जाधव, सुभाष माळी, तानाजी गायकवाड, समाधान गायकवाड, शंकर धोत्रे, आप्पा जाधव, प्रकाश जाधव, राजु जाधव, धनाजी चंदनशिवे यांच्यासह संतप्त गावकऱ्यांनी मुरूम उपशाचे काम बंद करून राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले एक तास महामार्ग बंद करण्यात आला जवळपास 6 किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रशासन काय दखल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.