Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जहाल जखमी नक्षल कमांडर किशोर कवडो यास पोलिसांनी अटक करून केले वैद्यकीय उपचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • खोब्रामेंढा-हेटाळकसा पोलीस-नक्षल चकमकीत झाला होता जखमी.
  • जहाल नक्षल कमांडरची प्रकृती स्थिर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. ११ एप्रिल: उपविभागीय पोलीस कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलीस मदत केंद्र कटेझरी जंगल परिसरात सी-६० जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असतांना २९ मार्च २०२१ रोजी खोब्रामेंढा-हेटाळकसा या ठिकाणी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीमध्ये जखमी झाला होता. सदर जहाल नक्षल टिपागड एरिया कमिटीच्या प्लाटुन नं. १५ चा कमांडर किशोर ऊर्फ गोंगलु ऊर्फ सोबु घिसु कवडो (३८) रा. रामनटोला ता. एटापल्ली यास पकडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले आहे. जहाल नक्षल किशोर कवडो याच्या पायाला खोब्रामेंढा चकमकीदरम्यान बंदुकीची गोळी लागली असल्याने त्याला गडचिरोली पोलीस दलाने तात्काळ अटक करून रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया होवुन त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. जहाल नक्षल किशोर कवडो याचा चकमक, खून, जाळपोळ अशा अनेक गुन्हयात सहभाग असल्यामुळे गडचिरोली पोलीस चौकशी करून पुढील कारवाई करणार आहेत.

याशिवाय गडचिरोली पोलीस दलाच्या विरोधात विघातक कृत्य करणाऱ्या नक्षलवाद्यांना व जखमी नक्षल कमांडर किशोर कवडो यास मदत करणारा कट्टर नक्षल समर्थक गणपत कोल्हे याला देखील गडचिरोली पोलीस दलाने अटक केली असुन यावर देखील गडचिरोली पोलीस दल पुढील तपास करीत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जहाल नक्षल किशोर कवडो यास ताब्यात घेतल्या नंतर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. चुकीच्या मार्गाने नक्षलमध्ये सामील झालेल्यांनी  आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.