Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धर्मराव कृषी विद्यालय अहेरी येथे राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने खेलो होळी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी 6 मार्च :- नैसर्गिक रंग खेळून होळी साजरी करण्यासाठी धर्मराव कृषी विद्यालयात हरित सेनेच्या वतीने इको फ्रेंडली होळी पाला पाचोळा व कचऱ्याची होळी करण्यात आली. प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक अनील भोंगळे होते. यांनी रासायनिक रंग खेळल्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व्यक्त करून नेसर्गिक रंग खेळण्याचे आव्हान केले.

राष्ट्रीय हरित सेना मास्टर ट्रेनर जयश्री खोंडे यांनी रासायनिक रंग यामधे कुठले रसायन असतात आणि ते आरोग्यावर काय परिणाम करतात याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. भागवत यांनी विद्यार्थ्यांना होळीच्या शुभेच्छा नैर्गिक रंग बनविण्याची पद्धती सांगितली. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक ठेंगरे, आतिश दोंतुलवर, मुकेश गोंगले, कडू, विश्वनादुलवर, शिवा दोंतुलवर, श्याम बारसे उपास्थित होते. कार्यक्रमाचे व इको फ्रेंडली होळीचे संचालन कु.समीक्षा बुरेवार या विध्यार्थिने केले .होलिका पूजन करून सर्वांनी रंगपंचमी साजरी केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.