राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी खोंडे दांम्पत्याचे केले स्वागत
अजुन ऊंच शिखर गाठण्याचे गौरवोदगार काढले
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 13 सप्टेंबर :धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी राज्यमंत्री व गड़चिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथील शिक्षिका जयश्री खोंडे यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्काराने मुख्यमंत्रीच्या हस्ते सन्मानीत झाल्याणे सोमवारी राजमहलात शील्ड व प्रशस्तीपत्र न्याहाळले व खोंडे दांम्पत्यांचे स्वागत केले.
संस्थेचे अध्यक्ष राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील शिक्षिका जयश्री खोंडे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करूण संस्थेचे पर्यायाने शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केल्याणे याचे आम्हाला आनंद व अभिमान असून या पुढेही शैक्षणिक क्षेत्रात चमकदारी कामगिरी करून अजुन ऊंच शिखर गाठावे असे गौरवोद्गगार काढले आणि खोंडे दांम्पत्य यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्राविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चाही केले.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ मॉडेल कॉलेज गडचिरोलीचे माजी प्राचार्य डॉ.विजय खोंडे, धर्मराव कृषी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल भोंगळे, पर्यवेक्षक युवराज करडे, प्राचार्य डॉ.मारोती टिपले, प्रा.नन्नावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.