Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पदवीची परीक्षा देण्यासाठी कोरची चे विद्यार्थी नेटवर्क च्या शोधात राज्य सीमेवर

गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेचा चा उडाला फज्जा
काॅलेज/विद्यापीठाची जबाबदारी पासून पळ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरची, दि.८ मार्च: आज बीएससी व बीए च्या थर्ड सेमिस्टर ची ऑनलाईन परिक्षा होती. परंतु तालुक्‍यात गेल्या दोन दिवसापासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्यामुळे  विद्यार्थ्यांची ऐनवेळी मोठी धांदल उडाली बरेच विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहीले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीए, बीएससी च्या थर्ड सेमिस्टर ची ऑनलाईन पेपर सुरू असल्याने नेटवर्क शोधण्यासाठी विद्यार्थी कोरची पासून 25-30 किमी अंतरावरील गोंदिया जिल्ह्यातील चिचगड, छत्तीसगड सीमेवरती जाऊन ऑनलाईन पेपर देत होते.तिथेही चांगले नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांची फजिती झाली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या गंभीर प्रश्नाबाबत येथील वनश्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निमसरकार यांचेशी चर्चा केली असता, कोरची तालुक्यात मागील दोन दिवसांपासून नेटवर्क नसल्याचे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांना माहिती दिली असल्याचे सांगितले.तरीही विद्यापिठाने ऑनलाईन परिक्षा घेतली असे ते म्हणाले. हा तालुका छत्तीसगढ राज्याला लागून आहे. तेथील जीओ कंपनी चा नेटवर्क कुठेकुठे असतो. तिथे जाऊन परिक्षा द्या असे विद्यार्थ्यांना सांगितले असेही डॉ. निमसरकार म्हणाले.

अशावेळी डिजिटल इंडियाचे बोंबा मारणारे गेले कुठे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला, कोरची तालुका निर्मितीपासून तालुक्यात फक्त भारतीय दूरसंचार विभागाचे नेटवर्क आहे ते कधी बंद असते तर कधी चालू अशी परिस्थितीत सुरू आहे. कोरची तालुक्यात बेतकाठी, मसेली, कोरची या तीन ठिकाणी दूरसंचार विभागाचा मनोरा उभारण्यात आला असून कोरची दूरसंचार विभागाचा केबल भंडारा वरून देवरी चिचगड मार्गे टाकल्यामुळे नेहमी कोरची येथे दूरसंचार सेवा विस्कळीत होत असते. दूरसंचार सेवा विस्कळीत झाल्यानंतर कोरचीवरून भारतीय दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना छत्तीसगड राज्यातील नेटवर्क शोधून माहिती द्यावी लागते. हे कोरची तालुक्याचे दुर्दैव आहे, कोरची येथील दूरसंचार विभागात एकही जबाबदार अधिकारी नाही. कोरची येथील दूरसंचार विभाग एका चौकीदाराच्या भरवशावर गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे.

आजच्या परिस्थितीत प्रत्येक विभाग नेटवर्क शी जुळलेला आहे. नेटवर्क शिवाय कोणत्याही प्रकारचे कामे केली जात नाही. लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावी/शहरात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या गावी आले आहेत. त्यांच्या सुद्धा ऑनलाईन परिक्षा व अभ्यासक्रम शिकविला जात आहे. परंतु कोरची येथील नेटवर्कच्या व्यत्ययामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी नेटवर्क ची समस्या जीवघेणी झाली आहे.

या परिस्थितीकडे आमदार/खासदारांनी लक्ष देऊन प्रश्न मार्गी काढावे अशी पालक, विद्यार्थी आणि समस्त नागरिकांची मागणी आहे.

Comments are closed.