Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२३ हजार रोजगार मिळणार ? राज्यात ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार.
  • एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य लवकरच पूर्ण करेल.
  • यात 15 कंपन्यांमार्फत जवळपास 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई 3 नोव्हेंबर :-राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष पुर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५कंपन्यांमार्फत जवळपास ₹३४,८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसेच यामुळे सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आज झालेले सामंजस्य करार ही केवळ सुरूवात आहे. सुमारे 35 हजार कोटींची गुंतवणूक आज होते आहे ही महत्वाची गोष्ट आहे. लवकरच एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्र या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्याने देशात आघाडी घेईल.

“गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. गेल्या सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. जवळपास 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.