Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार !- फडणवीसांचा इशारा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 13 डिसेंबर:- ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार ! अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सरकारला इशारा दिलाय. भाजप ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते. एकाच पक्षाची लोकं वेगवेगळी भूमिका घेतात, काँग्रेस – राष्ट्रवादी तुमची नेमकी भूमिका काय आहे ते सांगा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ओबीसी सेलने समाजातील ३६४६ जातींना एकत्र आणणारा मेळावा आयोजित केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ओबीसी आरक्षणावर या सरकारमधील पक्ष हे वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर करावी, असे आव्हान विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजप म्हणून आम्ही भूमिका स्पष्ट करतो की ओबीसी आरक्षणात कोणाताही वाटेकरी आम्हाला मान्य नाही असेही ते यावेळी म्हणाले. मुंबई ओबीसी कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण पहा:- म.रा. विज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालया समोर कामाच्या वेळत क्रिकेट..

ओबीसी विकास महामंडळला आधी एकही पैसा दिला जात नव्हता. आपल्या सरकारच्या काळात ५०० कोटींचा निधी दिला वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. मात्र या सरकारच्या काळात एकही पैसा महामंडळला दिलेला नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपल्या सरकारच्या काळांत महाज्योतिची निर्मिती केली आणि त्यासाठी निधी दिला मात्र आज महाज्योती कुठे आहे असा प्रश्न पडल्याचे ते म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.