महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शेतकरी आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 14,ऑक्टोबर :- महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्ज मुक्ती योजना–2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जा पैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त़ रु. 50 हजार रुपये पर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे .या तीन वर्षा पैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे.त्या वर्षाच्या कर्जाची मुददल रक्क़म विचारात घेतली जाणारआहे.
या योजने अंतर्गत जिल्हयातील जिल्हा मध्य़वर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट़ क्रमांकासह (V-K लिस्ट़) पाहिली यादी दि.13 ऑक्टोंबर, 2022 रोजी प्रसिध्द़ करण्यात आलेली आहे. पाहिल्या यादीत नांव न आल्यामुळे या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. उर्वरीत पात्र शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यातील यादी लवकरच प्रसिध्द़ होणार आहे. विशिष्ट़ क्रमांका सहची यादी संबंधीत बँका, जिल्हा उपनिबंधक, व तालुका सहाय्य़क निबंधक कार्यालयात तसेच गाव चावडी, ग्रामपंचायत, विकास संस्था येथे प्रसिध्द़ करण्यात येणार आहे. विशिष्ट़़ क्रमांकासह यादी प्रसिध्द़ झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणिकरणा नंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्क़म त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे.
आधार प्रमाणिकरणासाठी गेल्या नंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्क़म चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंद वावयाची आहे, अशा प्राप्त़ होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुका स्त़रावर संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षते खाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिवाळी पुर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर रक्क़म जमा करण्याचे मा.मुख्य़मंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांचे आदेश असल्याने ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करुन घेणे आवश्य़क असल्याने तालुक्यातील आपले सरकार/ सी.एस.सीसेंटर/ संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी,गडचिरोली व जिल्हाउपनिबंधक,सहकारी संस्था, गडचिरोली यांनी केले आहे.
हे देखील वाचा :-
Comments are closed.