Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर प्रा.साईबाबा निर्दोष..

नक्षलींशी संबंध असल्याचा होता आरोप .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 14,ऑक्टोबर :- दिल्ली विद्यापिठात प्राध्यापक असलेले जे.एन.साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. प्रा.साईबाबा आणि त्यांचे सहकाऱ्यांवर नक्षलवाद्यांना सहकार्य करतात , सरकार विरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यास नक्षलीना उद्युत करतात असा आरोप होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.

२०१७ साली प्रा. साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नक्षलींशी लिंक असल्याच्या आरोपाखाली ट्रायल कोर्टाने शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. या निर्णयाविरुद्ध प्रा. जे.एन.साईनाथ यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे सुटकेसाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. मात्र न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आज निर्णय देतांना न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की, प्रा. साईनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली होती. पोलिस प्रा.साईनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सबळ पुरावे देवू शकले नाही.त्यामुळे न्यायालयाने आपल्या राखून ठेवलेल्या निर्णयात प्रा.साईनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश देवून त्यांची कारागृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी कॅप्टन बदलला

Comments are closed.