Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उच्च माध्यमिक शिक्षकांच्या ‘साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 25 फेब्रुवारी: – मराठी भाषे विषयीची एकत्रित माहिती सध्याच्या काळात ऑनलाईन स्वरुपात जगभरातील मराठी प्रेमींना उपलब्ध होणार आहे याबद्दल मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आनंद व्यक्त केला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून चार उच्च माध्यमिक शिक्षकांनी विकसित केलेल्या साहित्यवेदीया संकेतस्थळाचे श्री. देसाई यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते

डॉ. सुजाता शेणई, शीतल सामंत, डॉ. पांडुरंग कंद व नानासाहेब जामदार या पाठ्यपुस्तक अभ्यासगट सदस्यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. अशाप्रकारचे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तयार केलेले हे नावीन्यपूर्ण संकेतस्थळ आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

श्री.देसाई पुढे म्हणाले, हे संकेतस्थळ शालेय स्तर ते संशोधक-अभ्यासक यांच्यासाठी उपयुक्त होणार आहे. मराठी भाषा आणि साहित्याला उज्ज्वल परंपरा आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी शिक्षकांनी केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे.

मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी www.sahityavedi.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. विविध प्रकारचे कोश, शब्दांची व्युत्पत्ती, मराठी भाषेविषयीचे डॉ. गणेश देवी, डॉ. नीलिमा गुंडी, हरी नरके, डॉ. विद्या देवधर यांच्यासह अनेकांचे अभ्यासपूर्ण लेख, सुलेखन, वाङ्मयीन नियतकालिके, युवा साहित्यकार, भाषा आणि बोली यांचा संबंध, सार्वजनिक ग्रंथालये आणि साहित्य परिक्रमा यांसारख्या विविध विषयांचा अंतर्भाव दृक्-श्राव्य फितींसह यात केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.