Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फायर ऑडीट संदर्भात शासकिय रूग्णालयांची सभा व आग विझविण्याचे प्रात्यक्षिक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि. ११ जानेवारी आज जिल्हा शल्य चिकित्सक यांचे अध्यक्षतेखाली नुकतेच भंडारा येथे घडलेल्या प्रकरणाची पुनरावृत्ती न होण्याकरीता विद्युत कार्यकारीणीची सभा घेण्यात आली.

सदर सभेस कार्यकारी अभियंता बांधकाम, कार्यकारी अभियंता विद्युत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, आयडीडब्ल्यु अभियंता रा.आ.अ.जि.प. गडचिरोली, वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय अहेरी, वैद्यकिय अधिक्षक जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली यांचेसोबत फायर ऑडीट व मॉक ड्रील याबाबत चर्चा करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथिल विद्युत आकंक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. तसेच विशीष्ट नमुन्यात दर ६ महिन्यानंतर एकदा प्रमाणपत्र देण्यासंबंधिच्या सुचनाही देण्यात आल्या. रुग्णालयात आग लागल्यास बाहेर लवकर पडता येईल यादृष्टिने व्यवस्था करावी, अग्निशमन यंत्र बसवुन मॉक ड्रील घेणे एबीसी पध्दतीचे फायर डीस्टूंगविशर बसविण्यात यावे, सदर अग्निशमण यंत्र ऑक्सीजन सिलेंडर पासुन दुर ठेवावे, शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आग विझविण्यासाठी मॉक ड्रील घेण्यात यावे व फायर व्हॉल्व वापरण्यात यावे अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या. तसेच नगर परिषद फायर ब्रिगेड यांनी सर्व संस्थांना फायर ऑडीट साठी पत्र देण्यात यावे. फायर ऑडीट होईपर्यंत वरील उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी ४.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथिल सर्व अधिकारी व कर्मचारी यांना फायर डीस्टूंगविशर बद्दल नगर परिषद गडचिरोली यांचे मार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

Comments are closed.