Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एमएचटी सीईटीचा आज निकाल; कुठे आणि कसा पाहायचा?

निकाल MHT CET 2023च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर तपासता येतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 12 जून – MHT CET 2023 चा निकाल आज महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलद्वारे जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीईटीचा निकाल आज 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) ग्रुप्ससाठी निकाल जाहीर करेल.

पीसीएम (फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) या ग्रुपसाठी परीक्षा 9 ते 14 मे  दरम्यान घेण्यात ली होती. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) या ग्रुपसाठी परीक्षा 15 ते 20 मे  दरम्यान झाली होती. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. परीक्षा जवळपास 4.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. निकाल MHT CET 2023च्या वेबसाइटवर cetcell.mahacet.org वर तपासता येतील. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

असा पाहा MHT CET 2023 रिझल्ट?

  • निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या
  • cetcell.mahacet.org  या संकेतस्थळावर  portal links यावर क्लिक करा
  • त्यानंतर Check MHT CET Result 2023  या लिंकवर क्लिक करा
  • रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा
  • रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

MHT CET 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर काउन्सलिंग केलं जाईल. याद्वारे इंजीनिअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. काउन्सलिंग सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.