Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शोधग्राममध्ये १२० रुग्णांवर यशस्वी प्लास्टिक सर्जरी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 11 जून- धानोरा तालुक्यातील  शोधग्राम येथे ता. 10 जून रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली तालुका आणि जिल्ह्याच्या विविध आदिवासी भागातून तसेच आंध्रप्रदेश भागातून देखील रुग्ण शस्त्रक्रियेसाठी आले होते. प्लास्टिक सर्जरीकरिता 2 वर्षांपासून ते 12 ते 14 वर्षे वयोगटातील लहान मुले, तरुण तसेच प्रौढ रुग्णांचा समावेश आहे. या कॅम्पसाठी मुंबई येथून तज्ञ डॉक्टरांची चमू आली होती.  सुप्रसिद्ध सर्जन डॉ. श्रीरंग पुरोहित यांच्यासोबत डॉ. डॉ. निकुंज मोदी, डॉ. लीना जैन, डॉ. सुशील नेहते, डॉ. रश्मी राऊत, डॉ. प्रतिक शहा, डॉ. राणी उमुल खैर, सुप्रसिद्ध सर्जन डॉ. नितीन मोकल, डॉ. नंदिनी दवे, डॉ. स्नेहल तारे, डॉ. किम डिसुझा, डॉ. रेणुका पुरोहित, डॉ. रिशभ राज अशी तज्ञ डॉक्टरांची चमू या कॅम्पमधील रुग्णांवर उपचार करण्याकरिता आली होती.

मागीलवर्षी पासून शोधग्राम येथे प्लास्टीक सर्जजी कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत ४ कॅम्प झाले असून या ४ कॅम्पपमध्ये एकूण १२० रुग्णांवर यशस्वी शस्त्रर्किया करण्यात आली आहे. सर्जरीची शंभरी पूर्ण केल्याच्या आनंदात  ता. ११ जून रोजी शोधग्राम येथे पद्मश्री डॉ. राणी बंग यांच्या हस्ते सर्व डॉक्टरांना प्रमाणपत्र प्रदान करण्दात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शोधग्राम येथील रुग्णांना उच्चप्रतीची सेवा देण्यासाठी डॉ श्रीरंग पुरोहित आणि त्यांची टीम नेहमीच तत्पर असते. या शिबीरात लहान मुलांचे दुभंगलेले ओठ, टाळुशी संबंधीत शस्त्रक्रिया, तोंडाच्या आतील भागात खड्डा असणे, मुत्रपिंडाच्या छिद्राची शस्त्रक्रिया अशा विविध शारिरीक व्यंगांवर शस्त्रक्रिया करून गडचिरोली व आदिवासी भागातील रुग्ण तसेच पालक आणि नातेवाईकांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम सर्चच्या सहकार्याने तज्ञ डॉक्टर करीत आहे.या शस्त्रक्रियोसाठी कोणतेही शुल्क नसून ही सेवा सर्चकडून मोफत देण्यात येते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली व जिल्ह्याच्या बाहेरील देखील गरजू लोकांना सर्चतर्फे सवलतीच्या दरात आरोग्य सेवा पुरवण्यात येते. सर्वच स्तरातील गरजू लोकांना सहज, सुलभ आरोग्य सेवा मिळण्यासाठी सर्च च्या शोधग्राम येथील दंतेश्वरी दवाखान्यात विविध आरोग्य शिबीरे घेण्यात येतात. मुख्य म्हणजे गरजूंना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी सर्च राज्याच्या राजधानी – उपराजधानीतून डॉक्टरांना पाचारण करित असते. प्रत्येक महिन्याला शोधग्राम येथील दंतेश्वरी दवाखान्यात वेगवेगळ्या आजारांवर शिबीरे घेण्यात येतात आणि त्या शिबीरांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.
हे पण वाचा :-
https://youtu.be/KhR41yMUwq8
https://youtu.be/8DVEeLB7XqI

Comments are closed.