Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, भारताचा 209 धावांनी दारूण पराभव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 11 जून – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाव कोरलेय. ओव्हल येथे झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 209 धावांनी विराट पराभव केला. दुसऱ्या डावात 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 234 धाावंवर आटोपला. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट फेकल्या, त्यामुळेच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसलाय. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठी खेळी करता आली नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता तीन सामन्याच्या मालिकेतून ठरवायला हवा. पुढील हंगामापासून तसा निर्णय घेण्यात यावा, असे रोहित शर्मा म्हणाला. द्विपक्षीय मालिकेपेक्षा आयसीसी कसोटी फायनल महत्वाचा आहे, पराभवामुळे आम्ही सर्वजण निराश आहोत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फक्त इंग्लंडमध्ये का होतेय ? जगातील कोणत्याही ठिकाणी घेता येऊ शकते, असेही रोहित शर्मा म्हणाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.