जुना वघाळा गावातील स्थलांतरीत पक्षी परतीच्या मार्गावर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
जुना वघाळा गावाची लोकसंख्या ५०० च्या आसपास असून, या गावामध्ये एकूण चिंचेचे ४७ महाकाय वृक्ष असून, त्या वृक्षांवर मागील पन्नास वर्षापासून स्थलांतरित पक्षी उत्तर भारतातूनच नव्हेतर परदेशातून आगमन करीत आहेत. त्यात प्रामुख्याने करकोचा जातीचे पक्षी व तसेच विविध जातीचे रंगाचे अंदाजे आठ ते दहा हजार स्थलांतरित पक्षी वास्तव्य करतात.या पक्षांमध्ये चोच ब्लॉक, पांढरा कुदळा किंवा कंकर, छोटा पानकावळा, मध्यम बगळा, गाय बगळा, लहान बगळा, लाल बगळा, राखी बगळा, पांढरा शराटी, करकोचा, चित्रबलाक, काळा कावळा, चक्रवाक इत्यादी पक्षाचा समावेश आहे.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना) स्थलांतरीत पक्ष्यांचे गाव म्हणून गावाची ओळख आहे. या गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा युरोपातील देशातून तसेच हिमालयातून हजारो किमीचा प्रवास करून पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे .सात ते आठ महिने मुक्काम ठोकून प्रजनन काळ संपल्यानंतर आता हे स्थलांतरीत पक्षी आपल्या कुटूंबासह परतीच्या मार्गावर लागले असल्याचे दिसुन येत आहे.
आरमोरी तालुक्यातील पश्चिमेस पाच किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या एका छोट्याशा ग्रामीण भागात पर्यावरणाची एकजूट असलेले निसर्गरम्य वातावरण पाहावयास मिळते. ते फक्त जुना वघाळा गावातच. असतो. जुना वघाळा गावाची लोकसंख्या ५०० च्या आसपास असून, या गावामध्ये एकूण चिंचेचे ४७ महाकाय वृक्ष असून, त्या वृक्षांवर मागील पन्नास वर्षापासून स्थलांतरित पक्षी उत्तर भारतातूनच नव्हेतर परदेशातून आगमन करीत आहेत. त्यात प्रामुख्याने करकोचा जातीचे पक्षी व तसेच विविध जातीचे रंगाचे अंदाजे आठ ते दहा हजार स्थलांतरित पक्षी वास्तव्य करतात.
हे पक्षी प्रामुख्याने साधारणता मे ते जून महिन्याचे शेवटच्या आठवड्यात वघाळा येथील नदीघाटावर येतात. सर्वप्रथम आल्यानंतर मे ते जून महिन्यात चिंचेच्या झाडावर, बाभळीच्या काटेरी फांद्यानी आपापले सोयीचे घरटी बांधतात. जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शेवटी प्रजननाचा काळ या परदेशी पाहुण्या पक्षांचे यावर्षी जून महिन्यात आगमन झाले होते. आता हे पक्षी आपल्या पिल्लासह परतीच्या मार्गाला लागले आहेत.
हे देखील वाचा,
पोलिस अधीक्षक कार्यालयातील लाचखोर लिपिक एसीबीच्या सापळ्यात; दीड लाखांची केली मागणी
Comments are closed.