Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य झटके

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 29, ऑक्टोबर :-  दिनांक 29.10.2022 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यांमध्ये सिरोंचा, मेडाराम, झिंगानुर परिसरात भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. तसेच दि.28.10.2022 रोजी चे रात्री 11.30 ते 12.00 वाजता चे दरम्यान अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, उमानुर, मरपल्ली, जोगनपुडा, तिमरम या गावांमध्ये भुकंपाचे सौम्य झटके जाणवले आहे.

वरील दोन्हीही सिरोंचा व अहेरी तालुक्यात जाणवलेल्या भुकंपाचे झटक्यामुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी झालेली नाही. सदर भुकंपाची तिव्रता रिक्टर स्केल वर 3.8 तसेच भुकंपाची खोली 10 कि.मी. जमीनीखाली असल्याचे National Centre for Seismology New Delhi यांचेकडून माहिती झालेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.