Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

 ‘काळू – बाळू’ सह ६ मातब्बर तमाशा फड तात्पुरता बंद

आर्थिक संकट आणि पावसामुळे विदर्भ, खानदेशात प्रयोग ठप्प  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सांगली, 29, ऑक्टोबर :- उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेले आणि तमाशा कला प्रकारावर हुकूमत गाजविणारे सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील ‘ काळू – बाळू’सह राज्यातील सहा मोठे तमाशे तात्पुरते बंद पडले आहेत. दोन वर्षे कोरोना प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. त्यातच डिझेलच्या वाढत्या दरामुळे हे तमाशा फड़ आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच तमाशा बंद असल्याने उपासमार आणि आर्थिक चणचण सुरू आहे, तर दुसरी कडे पावसामुळे विदर्भ, खानदेशात तमाशाचे प्रयोग ठप्प आहेत. यावर्षी केवळ आठच फड विजयादशमीला रिवाजानुसार लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. पण पावसाचा त्यांना ही फटका बसला असून एक दोन शो करून हे फड विदर्भ आणि खानदेशात बसून आहेत. पुढील काळात होणारा यात्रांच्या कड या तमाशा फडांच लक्ष असून त्यावेळी तर तमाशा सुरू व्हावेत, अशी अपेक्षा धरून हे सर्व कलाकार बसले आहेत.

काळू – बाळूसह अंजली नाशिककर, भिका – भीमा सांगवीकर, कुंदा पाटील – पिंपळेकर, चंद्रकांत ढवळीपूरकर, दत्ता महाडिक पुणेकर हे सहा तमाशांचे फड बंद आहेत. तमाशाला ८० रुपये इतका तिकीट दर आहे. तिकीट काढून तमाशा पाहण्यास येणारा प्रेक्षक वर्गही दिवसेंदिवस खूपच कमी होत चालला आहे. तमाशाला आता केवळ ३५ ते ४० प्रेक्षकच येत असतात. या प्रयोगातून जमा होणाऱ्या गल्ल्यातून काहीच खर्च भागत नाही. त्यामुळे हे फड बंद ठेवले आहेत. संपूर्ण अर्थकारण बिघडल्याने आता जानेवारीत बाहेर पडण्याचे नियोजन सुरू आहे. गावोगावच्या सुरू होणाऱ्या यात्रावर आशा लावू फड मालक बसले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात्रा कमिटीकडून ‘ सुपारी ‘ घेऊन शो करण्याचा निर्णय या सहा फड मालकांनी घेतला आहे. महाराष्ट्रात जवळपास २२५ लहान – मोठे फड आर्थिक संकटात सापडले आहेत . प्रत्येकवर्षी विजयादशमीला सर्व फड बाहेर पडतात. तत्पूर्वी महिनाभर कलाकारांची जुळवा – जुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरुस्ती, लाईट व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी किमान १५ ते २० लाख रुपये लागतात. दरवर्षी सावराकडून कर्ज काढून ही रक्कम उभा केली जाते. कला जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तमाशात सुरत्या, हलगी, ढोलकी, तुणतुण, पेटीमास्तर, नर्तिका असे ७० ते ८० कलाकार असतात. चालक, क्लिनर, आचारी, व्यवस्थापक असा शंभरजणांचा लवाजमा असतो. लोखंडी स्टेज, तंबू , गेट, चार राहुट्या, जनरेटर, साऊंड सिस्टिम हे साहित्य आणि कलाकारांचा लवाजमा नेण्यासाठी पाच ट्रक आणि एक जीप असते. फडातील सर्वांचे दोनवेळचे जेवण आणि वाहनांतील डिझेल हा सर्व डोलारा सांभाळताना तोटाच होतो.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आर्यनमॅन हार्दीक दयानंद पाटील यांचे दोन आठवड्यांमध्ये दोन नविन साहसी विक्रम 

  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी 

Comments are closed.