Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आर्यनमॅन हार्दीक दयानंद पाटील यांचे दोन आठवड्यांमध्ये दोन नविन साहसी विक्रम 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

विरार,  29, ऑक्टोबर :- विरारमध्ये राहणारे आयर्नमॅन हार्दिक पाटील यांनी १७ वी ‘ कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा २०२२’ यशस्वीरित्या नुकतीच पार केली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यामध्येच नेदरलँड देशातील अँमस्टरडॅम  येथे पार पडलेली ‘ T C S पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा ‘ देखील हार्दिक पाटील यांनी एक दोन वेळा नव्हे तर तब्बल नव्यांदा पूर्ण केली आहे.

मागील दोन आठवड्यांमध्ये १७ वी ‘ कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा २०२२’ तसेच ‘ T C S पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा ‘ यांमध्ये आयर्नमॅन हार्दिक दयानंद पाटील यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. हार्दिकच्या या कामगिरीबद्दल विरार-वसईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली गेली आहे. हार्दिक पाटील यांच्या कामगिरीचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी 

 

Comments are closed.