Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

झोपलेल्या आरोग्य व्यवस्थेला जागी करण्यासाठी मनसेचे “जागता पहारा” अनोखे आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. १६ जानेवारी: भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागला. प्राथमिक तपासणी अहवालात सदोष इन्क्युबेटर आगीला कारणीभूत असल्याचे अहवालात सांगण्यात आले. 8 तारखेच्या मध्यरात्री सदर घटना घडली. घटनेच्या दिवशी दवाखान्यात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सदर मोठी दुर्दैवी घटना घडली. बेबी केअर युनिट मध्ये बेबी इन्क्युबेटर ओवर हिट झाल्यामुळे आग लागली. त्याठिकाणी त्यावेळेस जर कर्तव्यावर असणारे आरोग्य कर्मचारी जागी असते तर नक्कीच शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग लगेच लक्षात आली असती आणि एवढी मोठी दुर्घटना घडली नसती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर रात्रपाळीला कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य रात्रपाळीला जागून बजावायचे असते याची जाणीव आरोग्य कर्मचाऱ्यांना करून देण्यासाठी तसेच रात्रपाळीत झोपी जाणाऱ्या आरोग्य व्यवस्थेला जागी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेबी केअर युनिट बाहेर मनसे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जागरण करत “जागता पहारा आंदोलन” केले.

आंदोलनादरम्यान बेबी केअर युनिटच्या डॉक्टरांशी संवाद साधत रात्रपाळीत कर्तव्य बजावत असताना कोणीही झोपून जाऊ नये जेणेकरून भंडारा सारखी दुर्दैवी दुर्घटना घडणार नाही आणि आपात्कालीन परिस्थितीत लवकरात लवकर उपाययोजना करता यावे यासाठी मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.