अहेरी उपजिल्हा रुग्णालयात कोवीड-१९ लसीकरण मोहीमेला सुरुवात
पहील्या टप्प्यात १०७ आरोग्य कर्मचार्यांना देण्यात येणार लस
अहेरी, दि. १६ जानेवारी: अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयात कोवीड लसीकरणाला सुरवात झाली. उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते लसीकरण कक्षाचे रितसर उद्घाटन झाले व लसीकरणाला सुरुवात झाली.
पहील्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालयातील १०७ कर्मचार्यांची निवड झाली. लसीकरण ऐच्छीक असले तरी बहुतांश कर्मचारी लस घेण्यास ऊत्सुक आहेत. लसीकरणानंतर लस घेतलेल्या व्यक्तीवर देखरेखीसाठी वातानुकुलीत कक्ष तयार आहे.
१५ कर्मचार्यांनी लस घेतली त्यांच्यावर कुठलेच दुष्परीणाम आढळले नाही. उप जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांनंतर पुढील टप्प्यात प्राथमीक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारींना लस मिळेल. पुढे टप्प्या-टप्प्याने सफाई कर्मचार्यांसह सर्वच फ्रंटलाईन कर्मचार्यांना लस देण्यात येणार असल्याची माहीती वैद्यकीय अधिक्षक डॉ. कन्ना मडावींनी दिली. लसीकरण मोहीम सुरु असली तरी प्रत्येका पर्यंत लस पोहोचे पर्यंत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
Comments are closed.