Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावतीत मनसेचा विज बिल कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

अमरावती, दि. २६ नोव्हेंबर: एप्रिल महिन्यापासून कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, व्यवसायांना घरघर लागली, अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण हा दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असताना,महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीजबिल पाठवून शॉक दिला आणि जनतेचे डोळे पांढरे झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एरवी वर्षभराचं वीज देयक जितकं येतं तितक्या विजेची आकारणी केवळ तीन महिन्यांच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवली.त्यामुळे या वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी आज अमरावतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यात लॉकडाऊन मध्ये आलेली वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली,यावेळी आंदोलन कर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला यात पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेरच मोर्चा अडवला,व नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.