Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कारवाईच्या मागणीसाठी टाकीवर चढून आंदोलन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भंडारा, दि. २६ जानेवारी: ग्रामपंचायतीत झालेल्या गैरप्रकारात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणी ला घेऊन प्रजासत्ताक दिनीच एका व्यक्तीने गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा इशार देत आंदोलन केले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून त्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

किरण सातपुते असे या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही मोहाडी तालुक्यातील आंधळ्गाव येथील ग्रामपंचायतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार सातपुते यांनी केली होती. यावरून चौकशी करण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्यांकडून केवळ वसुली करण्यात आली. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, असे किरण सातपुते यांचे म्हणणे आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनी पहाटे ५ वाजता ते अचानक गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर चढले. हा प्रकार काही वेळातच गावात माहित झाला. यानंतर ध्वजारोहनाच्या तयारीत असलेल्या गावकऱ्यांनी टाकीकडे धाव घेतली आणि त्यांनी किरण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कारवाईच्या मागणीवर अडून आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. वृत्तलिहेपर्यंत किरण हे पाण्याच्या टाकिवरच आहेत. त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.