Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावतीत खासदार नवनीत राणा यांचे ठिय्या आंदोलन;मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

अमरावती, दि. १६ नोव्हेंबर: शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करण्यात यावे यासाठी व तुरुंगात असलेले आमदार रवी राणा यांची सुटका करावी या मागणीसाठी आज अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला शहरातील राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले, यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला.
आमदार रवी राणा यांनी तीन दिवसांपूर्वी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते, रवी राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने 20 शेतकऱ्यांसह रवी राणा तीन दिवसांपासून अमरावती कारागृहात आहे,
आमदार राणा कारागृहात असून प्रशासनाने दखल घेतली नसल्याचां आरोप केला.अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज शेतकऱ्यांना घेऊन मुंबई रवाना होणार असून उद्या मातोश्री समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

Comments are closed.