Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आगरी कोळी बोलीतील पहिली ‘दिवाली सांज’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई :- दिवाळी म्हटली की रोषणाई,फटाके,फराळ आणि सारा उत्साहाचा सण यातच उत्सव साजरा करताना अनेक ठिकाणी दिवाळी पहाटच्या संगीत आणि मैफलींचे कार्यक्रमे होत असतात. यंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना करोनाच्या सावटाचे ग्रहण लागले त्यामुळे अनेक ठिकाणचे दिवाळी पहाटचे कार्यक्रमे रद्द झाले. परंतु ठाण्यातील आगरी-कोळी साहित्यिकांनी एकत्र येऊन डोंबिवलीत पहिला दिवाळीचा आगरी-कोळी बोलीतील गीत-कवितांचा ‘दिवाली सांज’ हा कार्यक्रम केला. आर.टी म्युझीकचे तुषार पाटील आणि आगरी ग्रंथालय चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी सांज’ चा कार्यक्रम भरविण्यात आला जो रसिकांसाठी ऑनलाईन लाईव्ह ठेवण्यात आला होता. प्रस्तुत कार्यक्रमाची सुरवात लोकगीतातीव गायक किसन फुलोरे यांनी गणेशस्थवना बरोबर पारंपारिक गीते गायली आणि त्याच्या तालावर चित्रकार प्रकाश यांनी गणेशाची चित्र काढत केली. त्यानंतर रायगड भुषण साहित्यिक प्रा.एल.बी पाटील यांनी ६० वर्षापुर्वीची आगरी कोळ्यांची दिवाळी कशी होती हे सांगत गंमती जमती सांगीतल्या.

अमेरिकेत ॲपल मध्ये काम करीत असलेले ईंजीनीअर तरी साहित्यिक असलेले अमोल म्हात्रेही उपस्थित होते त्यांनी ‘ईस्कोट’ ही विनोदी आगरी बोलीतील कवीता सादर केली. करोनाच्या साथीच्या रोगाने आपल्याला काय काय शिकवलं हे कवी मोरेश्वर म्हात्रे यांनी आपल्या कवितेतुन सांगीतले.कवयत्री निर्मला पाटील यांनी ‘दिवाली सांज’ कार्यक्रमात दिव्यांशी रोषणाई करीत आगरी कोळ्यांच्या दिवाळीची प्रथा-परंपरा आपल्या ‘पयलेची दिवाली’ या कवितेतुन मांडल्या. चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील यांनी ‘बक्षीस’ या आगरी बोलीतील कथाकथन केले. कवी दया नाईक यांनी भाऊ-बहीणीच्या नात्याला भौतिक गोष्टीकडून वा गरीब-श्रीमंत म्हणुन न पहाता भावा-बहिणीच्या नात्याने पाहायला हवं हे सांगत ‘भावबीज’ कविता सादर केली.कवी सुनिल पाटील यांनी हळदी समारंभाच्या बदलत्या स्वरुपावर तर प्रकाश पाटील यांनी बदलत्या काळावरील ‘मी बोल्लु त माझा तोंड दिसतं ही कविता सादर केली. ‘दिवाली सांज’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सर्वेश तरे यांनी केले तसेच कवीतांसोबत आगरी बोलीतील ‘पयला आगरी’ ही कथा देखील त्यांनी सादर केली. या कार्यक्रमाची सांगता मोरेश्वर पाटील यांनी अनुवादीत केलेल्या आगरी पसायदानाने झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.