दुर्गम भागातील 31 ग्रापं परीसरात रेखाटले भिंतीचित्र
व्यसन थांबवून आरोग्य, पैसा व सुख कमवा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 30 ऑगस्ट – एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गर्देवाडा, वांगेतुरी, मेंढरी, गट्टा,जनबिया यासह संपूर्ण 31 ग्रामपंचायत मध्ये भिंतीचित्र रेखाटून दारू व तंबाखूच्या व्यसनापासून होणारे नुकसान पटवून दिले जात आहे. सोबतच व्यसनांपासून सुटका करून आरोय, पैसा व सुख कसे कमावता येतो याबद्दल मार्गदर्शन देखील केले जात आहे.