ग्रामसभेच्या निर्णयानुसार २००५ पासून लोहारा दारूविक्रीमुक्त
मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांचे यश
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 30 ऑगस्ट – मुलचेरा तालुक्यातील लोहारा हे एक छोटेसे गाव आहे. या गावातील नागरिकांच्या एकीमुळेच अवैध दारूविक्री गावात पूर्णपणे बंद आहे. ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. अशातच गावातील युवा पिढी व्यसनमुक्त घडावी व इतर गावांना प्रेरणा मिळावी हा मुख्य हेतू ठेवून गावाच्या प्रवेशद्वारावर विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. या गावात २००५ पासून ग्रामसभेच्या निर्णयानुसार दारूविक्री होत नाही.