Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक;निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

नागपूर, दि.29 जानेवारी : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रविवारी विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये मतदान पथके रवाना झाली आहेत. संबंधित प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. एकूण २२ उमेदवार निवडणूक लढवित असून गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर नागपूरसह अन्य पाच जिल्ह्यांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

सोमवारी ३० जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी आज त्या-त्या जिल्ह्यांच्या मुख्यालयातून मतदान पथके रवाना झाली आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत अजनी येथील सामुदायिक भवनातून दुपारी १२.२५ वाजता ४३ मतदान पथके रवाना झाली. सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान भंडारा जिल्ह्यात १२,गोंदिया जिल्ह्यात १०,वर्धा जिल्ह्यात १४, चंद्रपूर जिल्ह्यात २७ आणि गडचिरोली जिल्ह्यात १८ मतदान पथके रवाना झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

असे आहेत उमेदवार

 नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सहा जिल्ह्यातील २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात सतिश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष), प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष), डॉ. देवेंद्र वानखडे (आमआदमी पक्ष), राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष (युनायटेड)), अजय भोयर (अपक्ष), सुधाकर अडबाले (अपक्ष), सतिश इटकेलवार (अपक्ष), बाबाराव उरकुडे (अपक्ष), नागो गाणार (अपक्ष), रामराव चव्हाण (अपक्ष), रविंद्रदादा डोंगरदेव (अपक्ष), नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष), निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष), नरेंद्र पिपरे (अपक्ष), प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष), इंजि. प्रो. सुषमा भड (अपक्ष), राजेंद्र बागडे (अपक्ष), डॉ. विनोद राऊत (अपक्ष), उत्तमप्रकाश शहारे (अपक्ष), श्रीधर साळवे (अपक्ष), प्रा. सचिन काळबांडे (अपक्ष) आणि संजय रंगारी(अपक्ष) यांचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 124 केंद्रांवर होणार मतदान

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये 124 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यात 43 मतदान केंद्र, वर्धा जिल्ह्यात 14, भंडारा जिल्ह्यात 12, गोंदिया जिल्ह्यात 10, चंद्रपूर जिल्ह्यात 27 तर गडचिरोली जिल्ह्यात 18 मतदान केंद्र आहे.

2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

 

 

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.