Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरवणकर – शिवसेना वादात आता नारायण राणेंची नाट्यमय एन्ट्री

मातोश्रीच्या दुकानात बसून मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही काम उरलं नाही! - नारायण राणे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 12 सप्टेंबर :- एखादी सिरीयल वाहिनीवर चालू असते , आणि एकदम अशा एका मोडवर एखाद्या अभिनेत्याच्या एन्ट्रीने एक नवा ट्विस्ट निर्माण होतो .तसंच काहीसं सरवणकर- शिवसेना वादात केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांची झाली आहे.

शनिवारी गणेश विसर्जना दरम्यान शिवसेना व सरवणकर समर्थक एकमेकांच्या समोर आले. आणि इथे एकमेकाला डीवचण्याच्या हेतूने वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यावेळी शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला असा त्यांचेवर आरोप झाला आणि त्यांचे विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्याचप्रमाणे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि काही शिवसैनिकांविरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली,त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आता यासर्व प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांचे घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. १५ ते २० मिनिटे चर्चा झाल्यावर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलतांना असे सांगितले की, सरवणकर माझे मित्र आहेत. काल ही घटना घडल्या मुळे मी त्यांची भेट घेतली. सरवणकर यांनी गोळीबार केला यात कितपत तथ्य आहे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फायरिंग झाले की आवाज येतो. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचे मार्केटिंग करण्याशिवाय दुसरं काही उरलं नाही.पण असले हल्ले करू नका, मुंबई -महाराष्ट्रात फिरायचे असेल तर परवानगी घ्यावी लागेल. ५० जण एकावर हल्ला करायला आले. त्यासाठी अजामीनपात्र कलम ३५४ लागतो, असेही राणे म्हणाले. युतीच्या धर्मानुसार एकमेकांच्या पाठीशी दोघांची ताकद असतेच असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वार्डाचे नूतनीकरण लांबल्याने दोन वर्षांपासून रुग्णांचे हाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.