Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वार्डाचे नूतनीकरण लांबल्याने दोन वर्षांपासून रुग्णांचे हाल

जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 12 सप्टेंबर :-   कोरोना काळात सुरू झालेल्या तीन वार्डाचे नूतनीकरण अद्याप पूर्ण न झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहे. दोन वर्षापूर्वी गरज नसताना सुरू करण्यात आलेले नूतनीकरणाचे कार्य पूर्ण का झाले नाही, या प्रश्नांचे उत्तर देखील अधिकाऱ्यांकडे नसल्याने रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सामान्य नागरिकांचा आधार असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय देखील प्रशासकीय अनास्थेचे बळी ठरत आहे. सध्यास्थितीत रुग्णालयातील तीन वार्डाचे नूतनीकरणाचे कार्य सुरू आहे. आश्चर्य म्हणजे हे कार्य गेल्या दोन वर्षापासून पूर्णच झालेले नाही. परिणामी जागेअभावी जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना बऱ्याचदा जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागते. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता ते उत्तर देण्यास टाळाटाळ करतात. इतकेच नव्हे तर रुग्णालयात कार्यरत डॉक्टर देखील यामुळे हैराण आहेत. रात्री अपरात्री येणारे रुग्ण जागा उपलब्ध न झाल्यास आम्हालाच एकवितात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे नूतनीकरण नेमके कुणाचे खिसे भरण्यासाठी होत आहे याबाबत रुग्णालय वर्तुळात कायम चर्चा असते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.