Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एटापल्ली तालुक्यात काँग्रेसला खिंडार

एटापल्ली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी जि.प. सदस्य संजयभाऊ चरडूके शेकडो कार्यकर्त्यांसह आदिवासी विद्यार्थी संघात दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

एटापल्ली 12 सप्टेंबर :- तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य संजयभाऊ चरडुके यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून आपल्या शेकडो समर्थकांसह आदिवासी विद्यार्थी संघात प्रवेश केला. चरडुके यांनी तब्बल अकरा वर्षं काँग्रेस कमिटीचे एटापल्ली तालुकाध्यक्ष पद भूषविले हे विशेष. त्यांनी मागील पंधरा दिवसापूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा पण राजीनामा देत, आदीवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्यावर विश्वास करीत आपल्या शेकडो समर्थकांसह संजय चरडूके यांनी आदिवासी विद्यार्थी संघात प्रवेश केला.

संजय चरडूके हे काँग्रेस पक्षाचे तिकिटावर एक वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. तसेच पंचायत समिती एटापल्लीचे उपसभापती पदही त्यांनी भूषविले होते, तसेच एटापल्ली येथील नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता बसविण्यामध्ये त्यांचा सिहांचा वाटा होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एटापल्ली तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चरडुके यांनी आपल्या समर्थकांसह आविस मध्ये प्रवेश केल्यामुळे तालुका काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. चरडुके सह यावेळी काँग्रेस चे दिलीप मडावी, माधव गावडे , सुरज कंनाके, सतीश मडावी, गणेश तुमरेटी, सीताराम तलांडे , रामा तलांडे , शंकर तलांडे, महारू उसेंडी सह शेकडो कार्यकर्त्यांनी आविस मध्ये प्रवेश केला आहे. आदिवासी विद्यार्थी संघात प्रवेश घेतलेल्या सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी शाल व श्रीफळ देऊन संघात स्वागत केले.

याप्रवेश कार्यक्रमाला आविसचे माजी जि.प. सदस्य कारूजी रापंजी, आविस चे सल्लागार शंकरजी दासरवार, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत जी चिपावार, रमेशतोरे माजी प.स. सदस्य, मणीकंठ गादेवार, खयूम भाई शेख, दिलीप गंजीवार ( माजी सरपंच आलपल्ली) विजय भाऊ कुसनाके ( माजी सरपंच आलपल्ली) जुलेख शेख सह आविसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :- 

Comments are closed.