Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मीडियाने माझ्या समोर येऊ नये – आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सोलापूर 12 सप्टेंबर :- काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकाऱ्यांना हाफकीन या व्यक्तीकडून औषधे घेऊ नका, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे वृत्त बोलल्याचे सर्व प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते. त्यावर अनेक उलट सुलट चर्चा झाल्या. मीडियाचे हे वृत्त आरोग्यमंत्र्यांच्या खूपच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.

सोलापूरात एका कार्यक्रमा दरम्यान तानाजी सावंत बोलत होते,’ मी काही अंगठे बहाद्दूर मंत्री नाही. माझ्या पदव्या पहा. माझ्या अनेक संस्था व कारखाने आहेत. माझ्याकडे १५० हून अधिक पीएचडी होल्डर कर्मचारी आहेत. हाफकीन वेळेवर औषधांचा पुरवठा करत नाही. त्यामुळे मी हाफकीन कडून औषधे घेऊ नका असे म्हटले. हाफकीन या व्यक्तीकडून औषधे घेऊ नका असे म्हटले नाही. मीडियाने बातमी देताना सर्व शहानिशा करून बातमी द्यावी. अन्यथा माझ्यापुढे येऊ नये. अशी र्दपोक्ती
आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.