अहेरीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे महागाईच्या विरोधात आंदोलन
जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम यांचे नेतृत्व. कोरोनाने वाचलो, अन महागाईने मेलो अशी घोषणाबाजी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम यांच्या नेतृत्वात गुरुवार १३ मे रोजी अहेरी येथील मुख्य चौकात महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध व निदर्शने करण्यात आले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या पुढाकाराने राज्यव्यापी आंदोलन गुरुवारी करण्यात आले हे विशेष!
येथील मुख्य चौकात ‘देश मे मोदी है, तो महंगाई है..’ कोरोनाने वाचलो अन महागाई ने मेलो’ अशा घोषणा व नारेबाजीतून केंद्र व मोदी सरकारचा निषेध व निदर्शने करण्यात आले. चुलीत घाला तुमची प्रधानमंत्री उज्वला योजना असा नाराजीचा सूरही यावेळी महिलांनी काढला.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांनी गॅस, पेट्रोल, डिझेल व केंद्र सरकारशी निगडित असलेले तत्सम जीवनावश्यक वस्तूंचे दिवसेंदिवस भाव वाढ होत असल्याने व मुख्यतः गॅस दरवाढ तर अक्षरशः आकाशाला भिडत असल्याने घरगुती आर्थिक बजेट कोलमडत आहे यासाठी केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व संताप व्यक्त करून तात्काळ सदरची भाववाढ कमी करण्यासाठी या आधी व आता लाक्षणिक निषेध करीत असून केंद्र सरकारने भाववाढ तात्काळ कमी न केल्यास यापुढे मात्र तीव्र स्वरूपात केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडण्याचा इशाराही शाहीन भाभी हकीम यांनी दिले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, माजी नगरसेविका ममता पटवर्धन, विमल गावडे, नसरीन शेख, जयश्री मडावी, फराणा शेख आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा :
गडचिरोली जिल्ह्यात आज 506 कोरोनामुक्त तर 12 मृत्यूसह 266 नवीन कोरोना बाधित
काँग्रेसच्या माजी आमदाराच्या पुत्राला डॉक्टर ला मारहाण करणे भोवले आरमोरी पोलीसाकडून अटक
Comments are closed.