Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा खासदार नवनीत राणा यांच्या कडून निषेध.

अर्णव गोस्वामी यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती 4 नोव्हेंबर :- अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती त्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र आज सकाळीच रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली असून ते सध्या रायगड पोलिसांच्या ताब्यात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावर बोलताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून गोस्वामी यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे तसेच जो कोणी ठाकरे सरकार विरोधात बोलणार त्याला अशाच प्रकारे तुरुंगात थांबणार का असा सवालही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले असून त्यांनी आता भाजपशी सलोका साधला आहे. राणा दांपत्य सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करत आहे.

Comments are closed.